ही वेळ आता शेवटची
महाराष्ट्र
January 22, 2026
BMC Election 2026
सद्या महाराष्ट्रात सुरू आहे महानगरपालिका निवडणूक. ही निवडणूक केवळ राजकीय लढाई नाही तर या शहरांच्या आत्म्याची परीक्षा आहे आणि हो या महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा आत्मा हा मराठीच आहे. या निवडणुकीत मतदार रस्ते, पाणी, आरोग्य या सोबतच मराठी माणसाचा हक्क आणि मराठी भाषेचा मान शोधत आहे. प्रचाराच्या गदरोळात घोषणाबाजी पेक्षा स्थानिक प्रश्नांवर बोलणारा उमेदवार जनतेला आज हवा आहे. पण त्याचवेळी शहर घडवताना विकासासोबत मराठी संस्कृती जपली जाणार का, हा प्रश्न मतदार राजा विचारत आहे. सद्या सोशल मीडिया, मीडिया किंबहुना सर्वत्रच एक विषय खूप चर्चेत आहे तो म्हणजे बिनविरोध निवडणूक! पण सर्वच पक्ष आणि उमेदवारीनी एक गोष्ट लक्षात ठेवावी सर्वांचा अंतिम निर्णय हा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरच होईल फक्त निवडणूक आयोगाने देखील मतदारांचा योग्य आदर राखावा हीच अपेक्षा. मराठी शहराचा कारभार हा फक्त मराठी माणसाच्या हातात राहिला पाहिजे ही मागणी आज जनतेत जोर धरताना दिसत आहे; कारण ही निवडणूक शहराच्या विकासासोबत मराठी माणसाची ओळख टिकवण्याची लढाई बनली आहे. त्यामुळे जनतेने देखील कुठल्याही राजकीय आमिषाला बळी न पडता निदान पुढच्या पिढीसाठी ही निवडणूक निर्णायक करावी हीच अपेक्षा महावृत्तांत संपूर्ण महाराष्ट्राकडे करत आहे.
Tags: News