Mccia - रिअल इस्टेटमध्ये नव्या संधींचा वेध: “Expand Your Business Horizons” कार्यक्रम मुंबईत यशस्वी
महाराष्ट्र
March 09, 2026
ViralMaharashtra Chamber of Commerce Industry & Agriculture चे अध्यक्ष श्री. रविंद्र माणगावे यांच्या मार्गदर्शनाखाली रिअल इस्टेट कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “Expand Your Business Horizons” हा विशेष रिअल इस्टेट कार्यक्रम मुंबईतील फोर्ट येथे पार पडला. रिअल इस्टेट क्षेत्रातील भविष्यातील संधी, टोकनायझेशन आणि डिजिटल तंत्रज्ञान यावर या कार्यक्रमात विविध तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतपर भाषण आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार श्री शेखर घोडके यांनी केला. यावेळी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान तज्ज्ञ Dr. Jane Thomason यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रातील सध्याच्या घडामोडींवर भाष्य करत Mr. Tejas Rao यांनी बाजारपेठेतील बदलते ट्रेंड आणि उद्योगासमोरील संधी याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर प्रमुख वक्त्या Dr. Jane Thomason यांनी रिअल इस्टेटमधील टोकनायझेशनचा जागतिक स्तरावरील अनुभव, आंतरराष्ट्रीय उदाहरणे आणि भविष्यातील संधी यावर सविस्तर भाष्य केले. त्यांच्या मते, ब्लॉकचेन आणि टोकनायझेशनमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होत असून या तंत्रज्ञानामुळे व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ होऊ शकतात. त्यानंतर Mr. Gaurav Somwanshi आणि Mr. Nihal Raj यांनी भारतातील टोकनायझेशनसंबंधी नियम, कायदेशीर बाबी आणि त्यातील अनुपालन याविषयी मार्गदर्शन केले. भारतात या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, याबाबत त्यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. पुढे Mr. Nitin Sarna यांनी टोकनायझेशनची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेली व्यावहारिक पावले आणि भविष्यातील रोडमॅप याविषयी मार्गदर्शन केले. उद्योग क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी या नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून व्यवसायाच्या नवीन संधी शोधाव्यात, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी Mr. Suresh Ghorpade यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला. रिअल इस्टेट क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वेध घेणारा हा कार्यक्रम उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.-
Tags: News