ताज्या बातम्या
Dadasaheb Phalke Story | भारतीय सिनेमाचे जनक | Raja Harishchandra ते Film Industry रायगडावर मनसेचा भव्य मेळावा | 20 व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य | MNS Mccia - रिअल इस्टेटमध्ये नव्या संधींचा वेध: “Expand Your Business Horizons” कार्यक्रम मुंबईत यशस्वी Headline Mar 7, 2026 Headline Mar 6, 2026

आमच्याबद्दल

संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा प्रदेश म्हणजेच महाराष्ट्र राज्य. राज्य असलं तरी नावातच राष्ट्र असल्याने एक वेगळाच गर्व मनावर आरुढ होतो...

संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा प्रदेश म्हणजेच महाराष्ट्र राज्य. राज्य असलं तरी नावातच राष्ट्र असल्याने एक वेगळाच गर्व मनावर आरुढ होतो. महाराष्ट्रात जन्मल्याचा माज यातूनच तर तयार होतो. पण हा माज महाराष्ट्र घडविण्यासाठी आहे बिघडवण्यासाठी नाही. महाराष्ट्रातील ठळक गोष्टी, कोणतीही मोडतोड न करता, रोखठोक, जशाच्या तश्या. मग त्या कुठल्याही क्षेत्रातल्या असो. महावृत्तांत हे महाराष्ट्रातील चॅनेल असलं तरी जगभरातल्या घडामोडींचा इथे आढावा असणार आहे. बातमी कोकणातील असो वा कॅलफोर्नियातील. महाराष्ट्रीय दृष्टीकोनातून तिचं विश्लेषण केलं जाणारच. निरपेक्ष, निर्विकार आणि निर्विलेप दृष्टीकोन ही काळाची गरज आहे. व्हॉट्सप युनिव्हर्सिटी आणि विकला गेलेला मिडीया यातून जन्माला येणाऱ्या बातम्यांनी आजची पिढी नासू लागली आहे. सत्य आणि स्वच्छ जाणून घेण्याचा या पिढीला अधिकार आहे. तो अधिकार जपायचा वसा घेऊन पुढे येत आहे महावृत्तांत.