Thane MAYOR News | Thane Mahapaur | Eknatha Shinede
महाराष्ट्र
February 04, 2026
आज (30/1/2026) ठाणे महानगरपालिकेच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महायुतीकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोकर यांनी महापौर पदासाठी आपला अर्ज अधिकृतरित्या सादर केला. तर भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल केली. या प्रसंगी शिवसेनेचे ठाणे खासदार नरेश मस्के, आमदार रविंद्र फाटक आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. भाजपकडून आमदार निरंजन डावखरे यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. महायुतीकडून दोन्ही पदांसाठी उमेदवारी निश्चित झाल्याने ठाणे महापालिकेतील सत्तास्थिती आता स्पष्ट झाली आहे. येत्या काळात ठाणे शहराच्या विकासकामांना गती देण्यात येईल, असा विश्वास यावेळी नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला. ठाणे महापालिकेतील या घडामोडी आणि पुढील राजकीय हालचाली जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा.
Tags: News