Rohit Pawar Press Conference
महाराष्ट्र
March 06, 2026
Viralआज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी बारामती येथील विमान अपघात प्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की अपघाताच्या तपास अहवालात अनेक तांत्रिक त्रुटी असून संपूर्ण चौकशी पारदर्शक पद्धतीने झालेली नाही. Directorate General of Civil Aviation अर्थात DGCA च्या अहवालात विसंगती असल्याचा दावा करत त्यांनी ब्लॅक बॉक्समधील संपूर्ण माहिती जाहीर करण्याची मागणी केली. कमी दृश्यता असताना विमानाला टेक-ऑफची परवानगी कशी देण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याचबरोबर, अपघातावेळी विमान झाडाला आदळल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. मात्र, झाडाला धडक बसल्यानंतरच अपघात झाला की त्याआधीच तांत्रिक बिघाड झाला होता, याबाबत स्पष्टता नसल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. त्यामुळे या मुद्द्यावर स्वतंत्र तांत्रिक तपासाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संबंधित कंपनीला कोणीतरी संरक्षण देत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली. हे प्रकरण आता राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
Tags: News