Headline 4 march 2026
महाराष्ट्र
March 04, 2026
ViralHeadline 1
Trikar
युद्धजन्य परिस्थिती!
कंटेनर थांबले! शेतकरी चिंतेत!
पश्चिमआशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे Navi Mumbai येथील JNPT येथे कांदा आणि द्राक्षांनी भरलेले शेकडो कंटेनर दोन दिवसांपासून थांबले आहेत. निर्यात लांबल्यास स्थानिक बाजारात मालाची आवक वाढून दर आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Headline 2
Trikar
कुर्ला–गोवंडी छापेमारी!
३ संशयित ताब्यात!
दहशतवादी विचारधारेचा संशय!
Maharashtra ATS ने Kurla आणि Govandi भागात छापेमारी केली. या कारवाईत ३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
प्राथमिक तपासात संबंधित तिघेही एका दहशतवादी संघटनेच्या विचारधारेने प्रभावित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
Headline 3
Trikar
इंधन दरवाढीची भीती; पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड
पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन दर वाढणार असल्याची अफवा पसरताच मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी झाली.
तेल कंपन्यांनी दरवाढीचा कोणताही निर्णय नसल्याचे स्पष्ट केले असून पुरवठा सुरळीत असल्याची माहिती दिली आहे. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Headline 4
Trikar
शरद पवार पुन्हा राज्यसभेत; काँग्रेस- शिवसेना ठाकरे गट पाठिंबा
भारताच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याबाबत एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संसदीय अनुभव लक्षात घेता पवार यांचा मार्ग सुकर मानला जात असून अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Headline 5
Trikar
पक्ष संघटनावर भर; विलीनीकरणाची चर्चा थांबली – जयंत पाटील
अजितदादांच्या निधनानंतर सुरू असलेली विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की सध्या पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात असून कोणत्याही विलीनीकरणाचा प्रश्न नाही. कार्यकर्त्यांनी अफवा न ऐकता पक्षबांधणीवर लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले
Tags: News