मुंबईचा विकास का झाला नाही? फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबो
महाराष्ट्र
January 23, 2026
कालच्या शिवशक्तीच्या सभेत मुख्यमंत्री आणि भाजपचे इतर नेते हे मुंबई बाहेरचे आहेत त्यांना मुंबईशी कसला लगाव असणार…?असा प्रश्न ठाकरे बंधू यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना…., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले, “ ठाकरे बंधू मुंबईत जन्माला येऊन आणि इथेच मोठे होऊनही मुंबईचा विकास का झाला नाही.” गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असूनही सामान्य मुंबईकरांच्या समस्या सोडवल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीसांनी पुढे म्हणाले घरांचा प्रश्न, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधा यावर ठाकरे बंधूंनी ठोस काम कधी केलेच नाही. या उलट फडणवीसांनी आपल्या सरकारच्या कामांचा दाखला देत मेट्रो प्रकल्प, चाळ पुनर्विकास, रस्ते आणि पायाभूत सुविधा यामुळे मुंबईचा चेहरा बदलत असल्याचा दावा केला. दरम्यान, या आरोपांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. मुंबईचं राजकारण तापलं आहे… आणि येणाऱ्या निवडणुकांत हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
Tags: News