दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत बिहार भवन , बिहार सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.

महाराष्ट्र

January 21, 2026

मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय आता अधिकृत झाला आहे. बिहार सरकारने मुंबईत सुमारे ३० मजली भव्य बिहार भवन बांधण्यास मंजुरी दिली असून, या प्रकल्पासाठी जवळपास ३१४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दिल्लीतील बिहार भवनच्या धर्तीवर हे भवन उभारण्यात येणार असून, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एलिफिंस्टन इस्टेट परिसरात ही इमारत उभी राहणार आहे. या बिहार भवनमध्ये सरकारी कार्यालये, बैठक कक्ष, विश्रांतीगृहे तसेच आधुनिक सुविधा असणार आहेत. या इमारतीत एकूण १७८ खोल्या आणि २४० खाटांचे डॉर्मिटरी तयार करण्यात येणार आहे. विशेषतः उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या बिहारमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हे भवन मोठा आधार ठरणार आहे. मुंबई हे देशातील प्रमुख वैद्यकीय केंद्र असल्याने दरवर्षी हजारो रुग्ण बिहारमधून येथे येतात. त्यांना निवास, मार्गदर्शन आणि मदत मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे बिहार सरकारकडून सांगण्यात आले आहे. मुंबईतील या बिहार भवनामुळे परराज्यातील नागरिकांसाठी सुविधा वाढणार असून, राज्यांमधील समन्वय अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Tags: News

YOU MAY ALSO LIKE