MCCAI News
बिजनेस
February 26, 2026
रणांगण जिंकणारा राजा… आजच्या कॉर्पोरेट जगालाही दिशा देऊ शकतो का?” याच विचारातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी २०२६ रोजी Mahratta Chamber of Commerce, Industries and Agriculture अर्थात MCCIA च्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. MCCIA आणि जमोनी Agriculture सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रेरणादायी उपक्रम पार पडला. ‘छत्रपती शिवाजी महाराज – द कॉर्पोरेट वॉरियर’ या विषयावर झालेल्या सत्रात Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या युद्धनीती, दूरदृष्टी आणि अचूक अंमलबजावणीचा आधुनिक व्यवस्थापनाशी संबंध स्पष्ट करण्यात आला. अफझल खान प्रसंगाचे उदाहरण देत “फक्त प्लॅनिंग नव्हे, इम्प्लिमेंटेशनच यश ठरवतं” हा प्रभावी संदेश देण्यात आला. कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करत MCCIA चे सांस्कृतिक विभागाचे पहिले अध्यक्ष सारंग जगताप यांनी सांगितले की, शिवरायांचे विचार आधुनिक व्यवस्थापनाशी जोडून नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हेच या उपक्रमाचे ध्येय आहे. सेक्रेटरी जनरल सुरेश घोरपडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. MCCIA चे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी “गाव तिथे उद्योग” ही संकल्पना मांडत युवकांना स्वावलंबनाचा संदेश दिला. कार्यक्रमात शिवरायांच्या भव्य चित्रांचे अनावरण करण्यात आले आणि “जय भवानी, जय शिवराय”च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. इतिहासातून प्रेरणा घेऊन आधुनिक व्यवस्थापनाला दिशा देणारा हा उपक्रम युवकांसाठी मार्गदर्शक ठरला. जय भवानी… जय शिवराय!
Tags: News