शिवराय माझे पांडुरंग हरी
मनोरंजन
January 22, 2026
“शिवराय माझे पांडुरंग हरी” हा Official Video नुकताच प्रदर्शित झाला असून, या भक्तिगीतातून छत्रपती शिवाजी महाराज आणि पांडुरंग हरी यांच्यातील अतूट आध्यात्मिक नातं प्रथमच इतक्या भावपूर्ण आणि भक्तीरसाने भरलेल्या स्वरूपात मांडण्यात आलं आहे. इतिहासात शौर्य, स्वराज्य आणि पराक्रमासाठी ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा पहिलाच असा भक्तीप्रधान आविष्कार असून त्यांच्या विठ्ठलभक्तीचा, श्रद्धेचा आणि वारकरी परंपरेशी असलेल्या नात्याचा हा अंतर्मुख करणारा अनुभव आहे. माननीय.श्री सचिन शेजाळ (उपजिल्हाधिकारी, अमरावती) यांच्या प्रस्तुत या गीतामध्ये भक्ती, इतिहास आणि संस्कृती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. संथ आणि मधुर संगीत भावपूर्ण गायन आणि संयत दृश्यरचना यामुळे हा व्हिडिओ पाहताना मन शांत होतं आणि भक्तीभाव अधिक दृढ होतो. हे गीत केवळ ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. या भक्तिगीताचे संवाद श्री सचिन शेजाळ यांनी लिहिले असून, गीत व संगीत रोहित पाटील यांचे आहे. या गीताला स्वर दिले आहेत वैभव थोरवे, सागर म्हात्रे आणि रोहित पाटील यांनी. त्याच्या Official Video मध्ये कलाकार म्हणून वैभव थोरवे, सागर म्हात्रे आणि रोहित पाटील यांनी सादरीकरण केले आहे. हे गीत Hitveen Music या म्युझिक लेबल अंतर्गत सादर करण्यात आले असून, त्यांचा अधिकृत चॅनल @hitveenmusic आहे. महाराष्ट्रातील जनतेने हे गीत नक्की पाहावे, कारण हे गीत शिवरायांचे अध्यात्मिक आणि भक्तीरसाने भरलेले रूप प्रथमच उलगडते, वारकरी परंपरेची निर्मळ शिकवण देते आणि आपल्या संस्कृती, श्रद्धा व इतिहासाशी आपल्याला पुन्हा एकदा जोडून घेते आहे. सर्व शिवभक्त, वारकरी संप्रदायातील भाविक आणि अध्यात्मिक संगीतप्रेमींनी हा भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला Official Video नक्की पाहावा. तसेच अशाच नव-नवीन भक्तिगीते, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी महावृत्तांत या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.